शेवया
फुल फॅट दूध
साजूक तूप
साखर
वेलदोडे
काजू
पिस्ता
बदाम
चारोळे
मणुके
आक्रोड
दूध तापवून घ्या
त्याआधी बदाम, चारोळे पाण्यात भिजवत घालावे
नंतर पाण्यातून काढून बारीक तुकडे करून घ्यावेत
आक्रोड, पिस्ता आणि काजूचे बारीक काप करून घ्यावेत
वेलदोडे भाजून घेऊन त्याची पूड करावी
गॅस मंद आचेवर ठेवून कढई किंवा पातेलं ठेवावे
त्यात दोन चमचे साजूक तूप घालावे
तूप पातळ होऊ द्या. त्यात शेवया भाजून घ्या
शेवया बाजूला ठेवून द्या
त्याचच दूध ओतून उकळ काढावी
त्यात गोडीनुसार साखर आणि शेवया घालाव्यात
वरून वेलदोडे पूड घालावे
आता सर्व सुका मेवा घालून हळूहळू दूध ढवळत राहावे
खीर १० मिनिटे शिजू द्यावी
गॅस बंद करून खीरीचे पातेलं उतरून ठेवावे
बाप्पाच्या प्रसादासाठी शेवयाची खीर तयार आहे

Comments
Post a Comment