First Shravan Somwar fast : श्रावण उपवासाला टेस्टी साबुदाणा लापशी बनवा


https://pudhari.news/latest/620120/how-to-make-sabudana-lapsi-first-shravan-somwar-fast/ar

श्रावण मासमध्ये सोमवार व्रताला खूप महत्व आहे. पहिला श्रावण सोमवार येऊ घातलेला आहे. या उपवासाची दिवशी तुम्ही टेस्टी साबुदाणा लापशी बनवू शकता. ही लापशी म्हणजेच साबुदाण्याची खीर होय. ही लापशी खाल्ल्यानंतर उपवासाच्या दिवशी पोटदेखील भरेल. शिवाय कॅलरी आणि कर्बोदके, पायबरही अधिक असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल. फायबर हे अन्नपचनास उपयुक्त असते. बद्धकोष्ठता, अपचन सुधारण्यासाठीही मदत होते. तुम्हाला वजन वाढवायचे असल्यास साबुदाणा उत्तम उपाय आहे. 

साबुदाण्याचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. यामध्ये भरपूर कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्व असते. हाडांच्या मजबूतीसाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. शाकाहारी लोकांसाठी साबुदाणा उत्तम आहे. पचनास हलका आणि शरीराला ऊर्जा लगेच मिळते. अॅनिमियाच्या रुग्णांसाठी साबुदाणा फायदेशीर आहे.

साबुदाणा

दूध

साखर

साबुदाणा थोडावेळ धुऊन ठेवावा

एका भांड्यात एक पाणी घालून त्यात साबुदाणा शिजवून घ्यावा. 

मंद आचेवर साबूदाणा घट्ट होत आल्यानंतर हवे असल्यास त्यात थोडे आणखी पाणी घालावे. 

दुसऱ्या भांड्यात दूध उकळून घ्यावे

उकळ येत असताना त्यात साखर घालावी

लापशी जरा गोड होण्यासाठी पुरेशी साखर घालून ढवळून घ्यावे. 

दुधामध्ये पाण्यात शिजवलेला साबुदाणा घालावा 

काही वेळ शिजवल्यानंतर भांडे खाली उतरावे

गरम गरम लापशी सर्व्ह करावी


 https://pudhari.news/food/619022/how-to-make-crispy-sabudana-vada-recipe/ar

Comments