त्याआधी वांगे खाण्याचे फायदे जाणून घेऊया. वांग्यामध्ये फायबर्स असतात, त्यामुळे पोट भरल्याची जाणीव होते. वजन कमी करण्यासाठी वांगे फायदेशीर आहे. कॅलरीज कमी करण्यासाठी वांगी उपयुक्त आहेत. वांग्यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम असतात. हाडे मजबूत होण्यासाठी वांगी आरोग्यदायी ठरतात. पण, किडनीस्टोन असणाऱ्यांसाठी वांगी न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
INGREDIENTS
कांदा
लसुण
कच्चे शेंगदाणे
वांगे
पाणी
कडीपत्ता
लाल तिखट
मीठ
हळद
गरम मसाला
तेल
वाळलेल्या खोबऱ्याचा खिस
जिरा
कोथिंबीर
DIRECTION
कोवळी वांगी स्वच्छ धुवून घ्या
वांगी उभी कापून चार भाग करून घ्यावे
कढई गॅसवर गरम करून एक चमचा तेल टाकून वांगी भाजून घ्यावी
वांग्यांना ब्राऊन रंग आला की, बाजूला काढून घ्यावे
तेलात चिरलेला कांदा, कच्चे शेंगदाणे, लसुण, खोबऱ्याचा खिस चांगले भाजून घ्यावे
हे मिश्रण थंड झाले की, ते खलबत्ता अथवा मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
मिश्रण थोडे जाडसर वाटून घ्या
एक एक वांगे घेऊन हा मसाला त्यामध्ये भरून घ्या
उरलेला मसाला ठेवून द्या, तो वांगी शिजवताना लागेल
आता दुसऱ्या कढईमध्ये प्रमाणानुसार तेल गरम कारायला ठेवा
गॅस मंद आचेवर ठेवून एक चमचा जिरे टाका
५-६ कडीपत्त्याची पाने टाका
मसाला भरलेली वांगी एक एक करून तेलात सोडून द्या
मसाला दोन्ही बाजूला चांगले भाजून घ्या
त्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला, लाल तिखट घाला
वरून उरलेला मसाला टाकून हलक्या हाताने वांगी परतून घ्या
आता एक वाटी पाणी टाकून कढईवर झाकण ठेवून वांगी शिजवून घ्या
पाच मिनिटांनी वरून चिरलेली कोथिंबीर घाला
गरमागरम मसाले वांगी तयार आहे
NOTES
वांगी पूर्ण न कापता अर्ध्याहून जास्त उभे चिरून घ्यावे, जेणेकरून त्याचे सुटे भाग होणार नाहीत

Comments
Post a Comment